Breaking News

ओला कंपनीतील संशयास्पद गुंतवणूकीचे प्रकरण ईडीकडे

पुणे, दि. 21, ऑगस्ट - ओला आणी उबेर कंपन्यांतील संशयास्पद गुंतवणूकीसंदर्भात आम आदमी रिक्षा चालक संघटनेने नुकतीच सीबीआयकडे तक्रार  दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत सीबीआयच्या अधिकार्‍यांनी हे प्रकरण ईडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. 
उबेर कंपनी आर्थिक संकटात असल्याचे वृत्त आले आहे तर दुसरीकडे ओला कंपनीने 31/8/2016 ला प्रेफरंन्स शेअर 10 रुपयाला गुंतवणूकदारांना  दिली. कंपनीच्या 31/3/16 ला संपलेल्या आर्थिक वर्षात 750 कोटी उलाढालीवर 2300 रुपये नुकसान जाहीर केले. असे असताना ओला 2016 मध्ये  काही विशिष्ट गुंतवणूकदारांना 10 रुपयांचे प्रेफरन्स शेअर 12500 रुपयांना विकते. तर 31/3/2017 ला 13000 रुपयाला. हा प्रकार काया आहे ?  हवाला आहे का असा सवाल आम आदमी रिक्षा संघटनेच्यावतीने श्रीकांत आचार्य यांनी विचारला आहे. ओला कंपनीमध्ये 5500 रुपयांची गुंतवणूक  चायनाने केली आहे, हि धोक्याची घंटा आहे का ? हा प्रश्‍न संघटनेला पडल्याने त्यांनी 14 ऑगस्ट रोजी सीबीआयच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना  कागदपत्रे सुपूर्द केली. सीबीआयचे अधिकारी हे प्रकरण ईडीकडे पाठवणार आहेत.