बी.व्ही.जी. संस्था, प्रदीप लोखंडे, रामदास फुटाणे शिवसह्याद्री गौरव पुरस्काराने सन्मानित
पुणे, दि. 21, ऑगस्ट - शिवसह्याद्री चॅरिटीबेल फाऊंडेशनतर्फे यंदाचा शिवसह्याद्री गौरव पुरस्काराने भारत विकास ग्रुप (बी.व्ही.जी.) या संस्थेस, वाचन संस्कृती चळवळीसाठी योगदान देणारे ज्ञान की लायब्ररी प्रकल्पाचे संस्थापक प्रदीप लोखंडे, प्रसिध्द वात्रटिकाकार व माजी आमदार रामदास फुटाणे यांना भारती विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये भारत विकास ग्रुप (बी.व्ही.जी.) या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड, प्रदीप लोखंडे यांची कन्या युगांती प्रदीप लोखंडे व वात्रटिकाकार व माजी आ. रामदास फुटाणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देण्यात आला. भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल कैलास जाधव, सुनील चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी दीड कोटी रुपयांचे शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
बालगंधर्व रंगमंदिरामध्ये झालेल्या या कार्यक्रमास शिवसह्याद्री चॅरिटीबेल फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रविण गायकवाड, लागीर झालं जी या मालिकेतील मराठी अभिनेता निखिल चव्हाण, व्यंकटराव गायकवाड, अंकुश आसबे, सुनील कुशीरे, शांताराम कुंजीर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आजच्या काळात नोकर्या करण्याचे दिवस संपले असून नवनवीन तंत्रज्ञान वापरून युवकांनी पुढे गेले पाहिजे. त्यासाठी नियोजन असणे आवश्यक आहे. तरुणांनी कोठून आलो आहोत, कुठे आहोत, कुठे जायचे हे कधीही विसरू नये, भान ठेवून योजना आखल्या पाहिजेत आणि बेभान होऊन त्या वापरल्या पाहिजेत. भारती विद्यापीठ सुरु करताना आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, परंतु आम्ही डगमगलो नाही, यश अपयश पचवून उभे राहिलो, त्यामुळे भारती विद्यापीठाने दिल्लीमध्ये आपली शिक्षण संस्था उभारू शकली. राजेंद्र कोंढरे हे देखील जिद्दीने अनेक सामाजिक संस्थांमध्ये कौतुकास्पद कार्य करीत आहे.