ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर
मुंबई, दि. 3, ऑगस्ट - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती आता स्थिर आहे. पुढील दोन दिवस त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येईल, असे लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून आज सांगण्यात आले.
बुधवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना मुंबईच्या लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिहायड्रेशन आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या तक्रारीमुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना बुधवारी दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.