Breaking News

बिहार : नक्षलवाद्यांनी रेल्वे सेवा रोखली; मोबाईल टॉवर जाळला

पाटणा, दि. 3, ऑगस्ट - बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री नक्षलवाद्यांनी दोन रेल्वे कर्मचा-यांना (गेटमन) ओलीस धरून रेल्वे वाहतूक रोखली  तसेच मोबाईल टॉवरही जाळून टाकला.
नक्षलवाद्यांनी एक दिवसीय बिहार-झारखंड बंदची हाक दिली होती. दरम्यान 8 ते 10 नक्षलवाद्यांनी रात्री 11 वाजता किऊल जमालपूर भागात उरैन रेल्वे  स्थानकानजीक असलेल्या फाटकावर असलेले कर्मचारी प्रमोद कुमार यांना फाटक बंद करण्यास सांगितले. प्रमोद कुमार यांनी उरैन रेल्वे स्थानकासह अन्य रेल्वे  अधिका-यांना सूचना दिल्यानंतर रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली. त्यानंतर काही वेळाने नक्षलवाद्यांनी प्रमोद कुमार यांना दोन किलोमीटर दूर नेऊन त्यांची सुटका  केली.
दरम्यान नक्षलवाद्यांनी मध्यरात्री किऊल-झाझा भागात नक्षलवाद्यांनी रेल्वे कर्मचारी मुनी मंडल यांना रूळावर बॉम्ब ठेवण्यास सांगून रेल्वे वाहतूक थांबवण्यास  सांगितले. त्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे राजेंद्र नगर-दुर्ग एक्स्प्रेस रात्री थांबवण्यात आली. नक्षलवाद्यांनी हनुमानगढी भागातील  रिलायन्स कंपनीचा मोबाईल टॉवरला आग लावली.