Breaking News

पाकिस्तानलगतची सीमा बंदिस्त करण्यास प्राधान्य - बीएसएफ

नवी दिल्ली, दि. 3, ऑगस्ट - पाकिस्तानच्या सीमेलगत असलेली भारतीय सीमा बंदिस्त (सील) कण्यास प्राधान्य दिले जात आहे. जम्मू सेक्टरमध्ये मार्च 2018  पर्यंत अद्ययावत तंत्रज्ञानाने बनवलेले कुंपण लावण्यात येणार आहे, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के.के. शर्मा यांनी येथे दिली.
पाकिस्तान सीमेजवळ काहीही घडू शकते. त्याचे परिणाम गंभीर असतात. त्यामुळे ही सीमा पूर्णत: बंदिस्त करण्याचे काम सुरू आहे. दोन देशांतील आंतरराष्ट्रीय सीमा  सुरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रायोगिक स्तरावर योजना राबवली जात आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.
सध्या भारताचे बांगलादेशबरोबरचे संबंध अधिक चांगले आहेत. भारत-बांगलादेश सीमा अभेद्य करण्यासाठीही उपाययोजना सुरू असल्याचे शर्मा यांनी सांगितले.