चौकशी होईपर्यंत राधेश्याम मोपलवार यांची उचलबांगडी - मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई, दि. 3, ऑगस्ट - रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून हटवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली .
दूाणी वाहिनीवर मोपलवार यांच्या संभाषणाची ध्वनीफित प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधी पक्षांनी विधीमंडळाच्या सभागृहात मोपलवार यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी केली होती . मोपलवार यांची एक महिन्यात चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवानसभेत केली होती . आज मुख्यमंत्र्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत मोपलवार यांना रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून हटवण्यात आल्याचे जाहीर केले . मुख्यमंत्री म्हणाले की , सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत मोपलवार यांना हटवण्यात येत आहे . मात्र मोपलवार यांच्यावरील आरोप समृद्धी महामार्गाशी संबंधित नाहीत असेही मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितले . मोपलवार यांच्यावरील आरोप आघाडी सरकारच्या काळातीलच आहेत . याचे पुरावे देण्यास आपण तयार आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले.