Breaking News

कर्नाटकचे ऊर्जा मंत्री शिवकुमार यांच्या कुटुंबियांच्या घरावर छापे

बंगळुरू, दि. 3, ऑगस्ट - कर्नाटकचे ऊर्जा मंत्री डी. के.शिवकुमार यांचे सासरे आणि जावई सचिन नारायण यांच्या घरांवर आयकर विभागाकडून आज छापे  टाकण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांनी घर सोडून कुठेही जाऊ नये असा आदेश आयकर विभागाकडून देण्यात आला आहे.
शिवकुमार यांचे सासरे आणि जावई सचिन नारायण यांच्या घरावर आणि हॉटपा टाकला. सचिन हे व्यावसायिक आहेत. आज शिवकुमार यांच्या घरी टाकलेल्या  छाप्यादरम्यान पाच नवीन लॉकरबाबत माहिती मिळाली आहे. यामधील दोन लॉकरचा पासवर्ड शिवकुमार यांनी सांगितला आहे. मात्र अन्य तीन लॉकरबाबत माहिती  देण्यास त्यांनी नकार दिला. यामुळे तपासात सहकार्य न केल्यामुळे शिवकुमार यांना सक्तवसुली संचलनालयाच्या ताब्यात देण्याचा विचार आयकर विभागातकडून केला  जात असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवकुमार यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला तर त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात  आहे.