दक्षिण एक्सप्रेसमधून दुतोंड्या सापाची तस्करी करणा-याला नागपुरात अटक
नागपूर, दि. 3, ऑगस्ट - दक्षिण एक्स्प्रेसमधून दुतोंड्या सापाची तस्करी करणार्या तरूणाला आरपीएफच्या विशेष शाखेने नागपूर रेल्वे स्थानकाहून 2 ऑगस्ट रोजी अटक केली. सामन सनी गोसावी (25, रा. अलाहाबाद, उत्तर प्रदेश) असे अटकेतील तस्कराचे नाव आहे.
यासंदर्भात आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार निजामुद्दीन - हैदराबाद दक्षिण एक्स्प्रेसने दुर्मिळ जातीच्या सापाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती आरपीएफच्या पथकाला मिळाली. आरपीएफ निरीक्षक भगवान ईप्पर यांनी एक पथक तयार केले. फलाट क्रमांक दोनवर पथक आधीच तैनात होते. गाडी संध्याकाळी नागपूर स्थानकात येताच पथकाने संपूर्ण गाडीचा ताबा घेऊन झाडाझडती सुरू केली. मात्र, काहीच हाती लागले नाही. अखेर रेल्वेच्या शेवटच्या जनरल बोगीत सामन एका पिशवीत चार ते पाच फूट लांबीचा दुतोंड्या साप विक्रीसाठी घेऊन जात होता. संशयास्पद हालचालीवरून त्याची चौकशी केली असता सापाची तस्करी करीत असल्याची कबुली त्याने दिली. त्याला ठाण्यात आणून सखोल चौकशी करण्यात आली. अलाहबादच्या जंगलातून साप पकडला असून हैदराबादला विक्री करायला घेऊन जात असल्याचे त्याने आरपीएफला सांगितले. साप पकडून त्याची विक्री करणे हाच त्याचा व्यवसाय आहे. यावरच तो कुटुंबाचे उदरनिर्वाह करतो. आजवर अनेक साप पकडून त्याची विक्री केल्याचेही त्याने सांगितले. या दुतोंड्या सापाची किंमत जवळपास 15 लाख रुपये असल्याचेही त्याने सांगितले. पाच किलोच्या वर असलेल्या दुतोंड्या सापाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपये असल्याचे बोलले जाते. हैदराबादला एक व्यक्ती या सापाची खरेदी करणार होता. सामनने यापूर्वी किती साप पकडले. कुठे आणि कोणाला विकले ? याची सखोल चौकशी सुरू आहे.