Breaking News

आंतरराष्ट्रीय खुल्या तलवारबाजी स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधीत्व करणार्‍या चिखलीच्या तरुणाला आ.बोंद्रेंची आर्थिक मदत

बुलडाणा, दि. 28, ऑगस्ट - थायलंड मधील बॅकॉक शहरात येत्या 9 ते 17 सप्टेंबर 2017 दरम्यान होणार्‍या जागतीक खुल्या तलवार बाजी स्पर्धेत भाग  घेण्यासाठी भारतीय तलवार बाजी संघाने नांदेड येथे झालेल्या निवड चाचणीत स्पर्धेनुसार निवडलेल्या 4 खेळाडुच्या संघात चिखलीतील अक्षय दिलीप गोलांडे या  तरूणाची निवड झाली आहे. हा संघ थायलंड या देशात होणार्‍या खुल्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या स्पर्धेत भारतातर्फे भाग घेण्याची संधी  चिखलीतील तरूणास मिळाल्याने जागतीक स्तरावर चिखलीचा नावलोकीक होणार आहे. 
या स्पर्धेसाठी आवशयक ते खेळाचे साहीत्य अतिशय महागडे असल्याने अक्षय गोलांडे याचेसाठी ते खर्चीत असल्याने चिखलीचे आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी  स्वत:च्या विकास निधीतून हे साहित्य खरेदी करण्यासाठी 40 हजार रूपयाची आर्थीक मदत अक्षय गोलांडे याला केली आहे.
भारत सरकारच्या युवक संचालनालय व क्रिडा मंत्रालयाची मान्यता असलेल्या भारतीय औल्म्पीक अशोसियशन, तलवार बाजी संघ देशात तलवार बाजीच्या स्पर्धा  आयोजित करून युवकांना या क्रीडा प्रकारात प्रोत्साहन देण्याचे काम करीत असतात. त्याच अनुशंगाने राज्य स्तरीय स्पर्धा आयोजित करून त्या खेळाडुंना राष्ट्रीय  स्तरावर संधी देणे व त्यात निवडलेल्या खेळाडुंना जागतीक स्तरावर संधी दिल्या जात असते. यातुनच भारतीय तलवार बाजी संघा तर्फे जागतीक स्पर्धेसाठी  आयोजित निवड चाचणीत भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी 4 खेळाडुंची निवड करण्यात आली असून त्यात चिखलीच्या अक्षय गोलांडे याची निवड झाली आहे. हा  संघ बॅकॉक, थायलंड येथे जागतीक स्पर्धेत भाग घेवून भारताचे प्रतिनिधीत्व करेल. ऐवढया मोठया स्पर्धेसाठी चिखली सारख्या ग्रामीण भागातील तरूणाची निवड ही  महत्वपुर्ण बाब होय. मात्र या स्पर्धेसाठी मोठा खर्च अपेक्षीत आहे, या खेळासाठी किमान 60 हजार रूपयाचे साहित्य व स्पर्धा सहभागासाठी विमान प्रवास, विजा,  निवास, व इतर असा 70 हजार रूपये खर्च अपेक्षीत आहे.
क्रिडा साहीत्यासाठी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी स्वत:च्या विकास निधीतून 40 हजार रूपयाची मदत या तरूणाला दिली आहे. क्रीडा प्रकारात चिखलीचे  प्रतिनिधीत्व करणार्‍या युवकांना प्रोत्साहीत करण्यासाठी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी जे पाउल उचलले आहे त्यामुळे क्रीडा प्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण  झाले आहे.