Breaking News

सेनेचे नगरसेवक सचिन जाधवविरुद्ध तोफखान्यात दारू पिऊन धिंगाणा व विनयभंगाचा गुन्हा दाखल

अहमदनगर, दि. 28, ऑगस्ट - मंगलगेट भागातील एका दुकानात दारू पिऊन गोंधळ घातल्या प्रकरणी सुरवातीस अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा राग  आल्याने पोलीस ठाण्यात येऊन नगरसेवक जाधव  यांनी तक्रार दारास व मदत करणार्‍याना शिवीगाळ व मारहाणीची धमकी  दिल्याची घटना घडली  या घटनेनंतर  जाधव यांनी मंगलगेट भागात जाऊन वाद झालेल्या कुटूंबातील एका महिलेच्या घरी जाऊन महिलेला शिवीगाळ व धक्काबुकी करून अश्‍लील भाषेत शिवीगाळ  केल्याप्रकरणी जाधव याच्याविरुद्ध घरात घुसून विनयभंग केल्याचा दुसरा गुन्हा शनिवारी रात्री दाखल करण्यात आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून  उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 
 आरोप असलेले सचिन जाधव हे सध्या सेनेचे  नगरसेवक असून ते मनपातील स्थायी समितीचे  सभापती.  होते . शनिवारी रात्री 9 च्या सुमारास मंगलगेट  चौकातील एका किराणा दुकानात सचिन जाधव यांनी दारू पिऊन शिवीगाळ केली  या घटनेची माहिती मिळताच या भागातील  पावन भिगारे घटनास्थळी आले  त्यांनी प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला पण तक्रादार याने पोलीस ठाण्यात तक्रार द्यायची असे सांगितल्याने भिगारे पोलीस ठाण्यात आले. त्यांनी तक्रार अर्ज  दिल्यानंतर ठाणे अंमलदाराने अदखलपात्र  गुन्ह्याची नोंद केली ,हि घटनासचिन जाधव याना समजल्यानंतर ते व सेनेचे संभाजी कदम पोलीस ठाण्यात आले ,  जाधव यांनीही तक्रार दिली त्याच्या अर्जावरून अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला पोलीस स्टेशन बाहेर उभे असलेले पावन भिगारे व इतर कार्यकर्ते पाहताच  जाधव यांनी दारूच्या नशेत पोलीस ठाण्याच्या आवारात उभे राऊन  शिवीगाळ करून धमकी दिली याच दरम्यान कदम यांनी जाधव याना गाडीवर मंगलगेट भागात  सोडले हा प्रकार भिगारे यांनी ,नगरसेवक कुमार वाकले व बारस्कर  याना सांगताच ते पोलीस ठाण्यात आले त्यांनी या घटनेसंदर्भात सहाय्यक पोलीस अधीक्षक शिंदे  व पोनी. पवार याची भेट घेऊन सर्व प्रकार सांगून गंभीर प्रकार असून गंभीर दखल घावी अशी मागणी केली. याच दरम्यान मनात राग धरून जाधव यांनी दारूच्या  नशेत मंगलगेट भागात गोधळ घातला  यामुळे पोलिसांनी मंगलगेट भागात भेट देऊन पोलीस तैनात केले  या घटनेची तक्रार दाखल होताच गंभीर दखल घेऊन अखेर  महिलेच्या  तक्रारीवरून  विनयभंगाचा गुन्हा दखल   करण्यात आला.  गुन्हा दखल झाल्याचे वृत्त रात्री शरिर वार्‍यासारखे पसरल्याने  उलटसुलट चर्चेला उधाण  आले . रविवारी सकाळी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस अधीक्षक  ंजन कुमार शर्मा याची भेट घेऊन घटनेची चर्चा  केलीसेनेचे   काम करणार्‍या कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार शहरात वाढत आहे याला आला घालवा अन्यथा सेनेला वेगळे पाऊल उचलावे लागेल असे सांगितले  . यावेळी अधीक्षकांनी तोफखाना पोलीस स्टेशन आवारात घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आवाजासह  दाखविल्याचे समजते .पोलिसांनी आरोपी पकडण्यासाठी  रात्री पोलिसानं पाठविले मात्र आरोपी जाधव रात्रीघरी आदळून आला नाही . या नंतर पोलीस प्रशासनाच्यावतीने शहरात  पोलीस बंदोबस्त वाढविला आहे.