Breaking News

सृजन घोटाळाप्रकरणी आरोपींविरोधात ‘सीबीआय’कडून एफआयआर दाखल

पाटणा, दि. 27, ऑगस्ट -  केंद्रीय अन्वेषण विभागाने बिहारमधील 1200 कोटी रूपयांच्या सृजन घोटाळा प्रकरणी सृजन महिला विकास समितीसह काही बँकांच्या  अधिकार्‍यांविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला. सहरसा येथील बँक ऑफ बडोदाचे संचालक, भागलपूर येथील बँक ऑफ बडोदाचे माजी संचालक व  रोखपालसह भूसंपादन विभागाच्या मुख अधिका-याविरोधात अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे. 
सृजन घोटाळ्याची चौकशी अन्वेषण विभागाद्वारे करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण  विभागाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला . केंद्र सरकारने बिहार सरकारची विनंती मान्य करत या घोटाळ्याची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरु केली आहे.