Breaking News

जीएसटी : 29.64 लाखांहून अधिक विवरण पत्रे सादर

नवी दिल्ली, दि. 27, ऑगस्ट - वस्तू व सेवा कर प्रणाली देशभर लागू झाल्यानंतर आतापर्यंत 29 लाख 64 हजारांहून अधिक व्यापा-यांनी पहिले व्यवसाय विवरण  पत्र सादर केले आहे. हे विवरण पत्र सादर करण्याची 25 ऑगस्ट ही अंतिम तारीख होती.
हा तपशील शुक्रवार सकाळपर्यंतचा असून त्यात आणखी 15 लाखांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नव्या कर प्रणाली अंतर्गत व्यापारी व कंपन्यांना  दर महिन्याला व्यवसायाचे विवरण पत्र सादर करायचे आहे आणि करांचा ऑनलाईन भरणा करायचा आहे. यासाठी व्यापा-यांना आधी 20 ऑगस्टपर्यंतची मुदत  देण्यात आली होती. नंतर त्यात वाढ करण्यात आली.