पाकिस्तानवर विश्वास ठेवता येत नाही ; अफगाणिस्तानमधील वृत्तपत्राची टीका
काबूल, दि. 24, ऑगस्ट - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांच्या पाठोपाठ आता अफगाणिस्तानच्या प्रमुख वृत्तपत्रातूनही पाकिस्तानवर टीका करण्यात आली आहे. पाकिस्तान आता विश्वासार्ह राहिलेला नाही, अशी टीका अफगाणिस्तान टाईम्सने आपल्या संपादकीय लेखातून केली आहे.
पाकिस्तानमधून दहशतवादी अफगाणिस्तानात घुसखोरी करत आहेत . दहशतवाद्यांच्या या कृत्यांना पाकिस्तान सरकारकडून पाठबळ मिळते आहे . दहशतवाद्यांना समर्थन देणे बंद करणे व अफगाणिस्तानच्या दहशतवाद विरोधातल्या लढाईत प्रामाणिकपणे साथ देण्यासाठी पाकला आता दुस-यांदा संधी दिली जात आहे. मात्र, पाक अशा योग्यतेचा नाही. त्यांच्याकडून कायम विश्वासघात केला जातो, असेही लेखात म्हटले आहे. अमेरिकन प्रशासन पाकविरोधात कडक पावले उचलण्याच्या तयारीत असून त्यामुळे पाकिस्तानची दूटप्पी भूमिका लवकरच संपुष्टात येईल, असेही यात म्हटले आहे.