पाकिस्तानबाबत आता नरमाई नाही - अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचा इशारा
वॉशिंग्टन, दि. 24, ऑगस्ट - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर कडाडून टीका केल्या नंतर बुधवारी अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांनीही पाकिस्तानबाबत यावेळी नरमाईची भूमिका घेतली जाणार नसल्याचे म्हटले आहे. दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याबद्दल पाकविरोधात यावेळी नक्कीच कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले. पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यासाठी अमेरिका का तयार नाही असा प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आल्यावर मॅटिस यांनी हे उत्तर दिले .
यापूर्वीही केवळ अशी टीका करून अमेरिका शांत बसल्याची उदाहरणे आहेत, असे वार्ताहरांनी विचारले. त्यावर तुम्हाला तुमचे उत्तर मिळवण्यासाठी आणखी थोडी वाट पहावी लागेल, असे त्यांनी सांगितले. मॅटिक्स यांनी चीफ्स ऑफ स्टाफना अफगाणिस्तान व पाकिस्तानशी निगडीत ट्रम्प सरकारचे धोरण कार्यान्वयित करण्याचे निर्देश दिले आहेत.