Breaking News

तिहेरी तलाकवर आजपासून बंदी: सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली, दि. 22, ऑगस्ट -  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल सुनावला. कोर्टाने तिहेरी तलाकचा  चेंडू केंद्र सरकारकडे टोलवत, सहा महिन्यात कायदा करण्याचा आदेश संसदेला दिला आहे. कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकला बंदी घालण्यात आली  आहे.म्हणजेच आजपासून संसदेत कायदा तयार होईपर्यंत तिहेरी तलाकवर बंदी असेल. मात्र कायदा होण्यास विलंब लागला तरीही तिहेरी तलाकवरील बंदी  कायम असेल. सरन्यायाधीशांसह 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज आपला निर्णय दिला. मात्र तिहेरी तलाकवरुन 5 पैकी 3 न्यायाधीश हे तिहेरी  तलाकविरोधात तर 2 न्यायाधीश हे तलाकच्या बाजूने होते.