Breaking News

मांस निर्यातदार ‘ईडी’कडून मोईन कुरेशीला अटक

नवी दिल्ली, दि. 27, ऑगस्ट - मांस निर्यातदार मोईन कुरेशी याला सक्तवसुली संचालनालयाने शुक्रवारी दिल्लीतून अटक केली. कुरेशीला दिल्लीतील न्यायालयात  हजर करण्यात येणार आहे. 
मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत कुरेशीला अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कुरेशी संचालनालयाच्या रडारवर होता. कुरेशीची संचालनालयाकडून  फेमा आणि पीएमएलएअंतर्गत चौकशी सुरू आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचे माजी संचालक ए.पी. सिंग आणि रंजीत सिन्हा हे कुरेशीचे निकटवर्तीय असल्याचे समजते.  सिंग आणि सिन्हा यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. हवाला माध्यमातून कुरेशीने काँग्रेस नेत्यांचा काळा पैसा परदेशात पाठवल्याचा आरोपही केला जात  आहे.