Breaking News

दहशतवादी कारवायांसाठी नेपाळचा वापर होऊ देणार नाही; नेपाळचे पंतप्रधान देउबा यांचे आश्‍वासन

नवी दिल्ली, दि, 25, ऑगस्ट - भारतविरोधी दहशतवादी कारवायांसाठी आपल्या भूमीचा वापर होऊ देणार नाही, असे आश्‍वासन पंतप्रधान देउबा यांनी आज दिले.  देउबा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी आणि देउबा यांच्या भेटीत अंमली पदार्थांच्या तस्करीवरील नियंत्रण मिळवण्यासह अन्य आठ  सामंजस्य करारांवर स्वाक्ष-या करण्यात आल्या. यावेळी त्यांच्यात द्विपक्षीय संबंध, प्रांतीय मुद्दे यांबाबत विस्तृत चर्चा झाली. या भेटीनंतर आमच्या भागीदारीबद्दलचे  पुनरावलोकन करताना सकारात्मक बैठक झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. नेपाळच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी भारत कटीबद्ध  असल्याचे आश्‍वासन यावेळी पंतप्रधानांनी देउबा यांना दिले.
स्वाक्ष-या करण्यात आलेल्या आठ सामंजस्य करारांपैकी चार करार नेपाळमधील भूकंपानंतरच्या पुनर्निर्मितीशी संबंधीत आहे. एप्रिल 2015 साली आलेल्या भूकंपात  नेपाळचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी येथील पुनर्निर्मितीसाठी भारत एक अब्ज डॉलरची मदत करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यापार्श्‍वभूमीवर उभय  देशांदरम्यान सामंजस्य करार करण्यात आले.