Breaking News

जागतिक बॅडमिंटन; पी.व्ही. सिंधूची अंतिम सामन्यात धडक

ग्लास्गो, दि. 27, ऑगस्ट - पी. व्ही. सिंधू हिने चीनच्या चेन युफेईवर मात करत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पी. व्ही. सिंधूने काल  (26 ऑगस्ट) झालेल्या उपांत्य सामन्यात चीनच्या चेन युफेईवर 48 मिनिटांत 21-13, 21-10 अशी मात केली.
जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरी गाठणारी पी. व्ही. सिंधू पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. अंतिम फेरीत सिंधूची लढत जपानच्या नोजोमी  ओकुहारा यांच्याशी होणार आहे. उपात्यंपूर्व फेरीत सिंधूने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली चीनच्याच सून यू हिचा 39 मिनिटांत 21-14, 21-9 ने  पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.