Breaking News

ट्राय कडून आयडिया कंपनीला 2 कोटी 97 लाखांचा दंड

नवी दिल्ली, दि. 27, ऑगस्ट - मे 2005 ते जानेवारी 2007 दरम्यान ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क घेतल्याबद्दल भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून  (ट्राय) आयडिया कंपनीला 2 कोटी 97 लाख 90 हजार 173 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम 15 दिवसांच्या आत जमा करण्याचे आदेश  भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) सल्लागार एस.टी. अब्बास यांनी दिले आहेत.
बीएसएनएल व एमटीएनएल नेटवर्कवर कॉल केलेल्या ग्राहकांकडून कंपनीने अतिरिक्त शुल्क आकारल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. हे अतिरिक्त शुल्क  कंपनी ग्राहकांना परत करू शकत नसल्याने दंडाची रक्कम दूरसंचार शिक्षण व संरक्षण निधी मध्ये जमा करावी लागणार आहे.
मे 2005 मध्ये असून दूरसंचार विभागाने महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू व उत्तर प्रदेश या राज्यांतील सेवा पुरविणार्‍या कंपन्यांना ॠइंटर सर्व्हिस एरिया  कनेक्टीव्हीटी’साठी परवाने दिले होते. यामुळे चार राज्यांतील सर्व कॉल्स लोकल कॉल अंतर्गत येतात. असे असूनही अनेक कंपन्यांनी ॠबीएसएनएल’ व एमटीएनएल  नेटवर्कवर कॉल करणा-यांकडून अतिरिक्त शुल्क आकारले.