Breaking News

केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची महाआरती

पुणे, दि. 27, ऑगस्ट - केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी रात्री ब्रह्मणस्पती मंदिरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी  त्यांच्या हस्ते महाआरतीही करण्यात आली. शहरातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे आज नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्दघाटन होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी  गडकरी शनिवारीच शहरात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी रात्री 11 वाजता प्रसिद्ध श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीची महाआरती केली. टस्ट्रने यावर्षी  ब्रह्मणस्पती मंदिराचा देखावा उभारला आहे. यावेळी ट्रस्टच्या वतीने गडकरी यांचा सत्कारही करण्यात आला.