Breaking News

नवाज शरीफ यांची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

इस्लामाबाद, दि. 27, ऑगस्ट - पनामा कागदपत्राप्रकरणी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा पुनर्विचार याचिका दाखल केली  आहे. सर्वोच्च न्यायालयाने 28 जुलै रोजी शरीफ यांना दोषी ठरविले होते. यामुळे शरीफ यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.
विदेशात बेनामी संपत्ती जमविल्याचा आरोप शरीफ यांच्यावर ठेवण्यात आला होता. हा आरोप अमान्य असल्याचे शरीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले  आहे. निवडणूक आयोगासमोर उत्पन्नाची माहिती सादर करणे बंधकारक नसल्यामुळे ही माहिती न दिल्याचे शरीफ यांनी याचिकेत नमूद केले आहे. शरीफ यांनी  यापूर्वीही तीन पुनर्विचार याचिका दाखल केल्या होत्या.