Breaking News

जगातील सर्वात महागड्या मुष्टीयुद्धाच्या सामन्यात मेवेदर विजयी

लास वेगास, दि. 27, ऑगस्ट - अमेरिकेत झालेल्या आजवरचे सर्वात मोठे बक्षीस लावण्यात आलेल्या मुष्टीयुद्धाच्या सामन्यात स्टार मुष्टीयोद्धा फ्लॉईड मेवेदर याने  अमेरिकेतील नामांकित मार्शल आर्ट्स अकादमी ’अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिप’चा मुष्टीयोद्धा कॉनॉर मॅकग्रेगॉरला पराभूत केले. या मुष्टीयुद्धासाठी विजेत्या मेवेदरला  बक्षीस म्हणून सुमारे 600 कोटींहून अधिक रक्कम मिळाली . याशिवाय, खास या सामन्यासाठी तयार करण्यात आलेला हिरेजडित बेल्टही देण्यात आला. विशेष  म्हणजे दोन वर्षे मुष्टीयुद्धापासून दूर असलेल्या मेवेदरने व्यावसायिक मुष्टीद्धात जिंकलेला हा 50वा सामना आहे आणि मेवेदर अद्यापही अजिंक्य आहे. या सामन्यानंतर  मेवेदरने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे.