Breaking News

अहमद पटेल यांचा पराभव निश्चित : शंकरसिंग वाघेला

अहमदाबाद,दि.8 : अहमद पटेल विजयी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मी अहमद पटेल यांना मत दिले नाही, अशी प्रतिक्रिया शंकरसिंग वाघेला यांनी मतदानानंतर दिली. काँग्रेसला ४० मते मिळणे सुद्धा शक्य नाही. भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील, असे भाकीतही त्यांनी यावेळी केले.
गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठीचे मतदानाला आज सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांचे भवितव्य पणाला लागले आहे. उर्वरित दोन जागांसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी रिंगणात असून या दोघांचाही विजय निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे.