Breaking News

विजयाचे श्रेय पणजीतील जनतेलाच : मनोहर पर्रीकर

पणजी, दि. 28, ऑगस्ट - पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेला विजय हा पणजीतील जनतेचा आहे असे सांगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मतदारांचे  आभार मानले. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पणजीतून पर्रीकर हे सलग सहाव्यांदा विजयी झाले. ‘गोव्यातील जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्‍वासाचा हा विजय  आहे. पणजीसह संपूर्ण राज्याच्या विकासासाठी मी सदैव कार्यरत राहीन आणि गोवेकरांनी माझ्यावर दाखवलेला विश्‍वास मी सार्थ ठरवेन, असेही पर्रिकर म्हणाले.  राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा पुढील आठवड्यात देणार असल्याचेही पर्रिकरांनी जाहीर केले.