Breaking News

भारत-पाक सीमेवरून पाकिस्तानी नागरिकाला अटक

नवी दिल्ली, दि. 05, ऑगस्ट - भारत-पाक सीमेवरून एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली. जावेद इकबाल असे त्याचे नाव आहे. तो  पाकिस्तानमधील भावलपुर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सतत दहशतवाद्यांकडून हल्ले केले जात आहेत. अशा परिस्थितीत  संशयिताला अटक झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर राजस्थान सीमेजवळील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.