काश्मीरमधील चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचे तीन दहशतवादी ठार
जम्मू, दि. 05, ऑगस्ट - जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचे तीन दहशतवादी ठार झाले. तर एक जवान जखमी झाला आहे. येथील परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसराला घेराव घातला. या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून तीन एके 47 जप्त करण्यात आल्या आहेत.
