लघु उद्योग भारती तर्फे 12 ऑगस्ट रोजी उद्योजकांचे राज्यस्तरीय संमेलन
मुंबई, दि. 05, ऑगस्ट - 1994 पासून सूक्ष्म आणि लघु उद्योजकांसाठी अखिल भारतीय स्तरावर सर्वोच्च संस्था असलेल्या लघु उद्योग भारतीचे उद्योजक सदस्य 12 ऑगस्ट 2017 रोजी एकमेकांशी आणि त्या सोबतच महाराष्ट्र राज्य सरकारशी मुंबईत संवाद साधताना दिसतील. उद्योगाच्या विविध पैलूंबाबत त्यांना असलेल्या चिंता धोरणकर्त्या समोर त्यांना मांडता याव्यात यासाठी हे व्यासपीठ असेल. ते त्वरित उपायांसाठी प्रयत्नशील असतीलच पण भविष्यातील आशादायी चित्रासाठी ते संवाद ही साधतील.
या संमेलनात कारखाना कायदे, कामगार कायदे, पायाभूत सुविधा, विविध अनुपालने इ. अशा उद्योग विषयक विषयांवर चर्चा होईल. या बरोबरच विद्युत पुरवठा आणि स्थिती, दर आणि दर्जा यावरही चर्चा होईल. व्याजदर, बँकांचा प्रतिसाद अशा वित्तीय समस्यांवरही चर्चा होईल असे लघु उद्योग भारतीचे कोकण प्रांत महासचिव श्री. भूषण मार्डे म्हणाले.
हे एक दिवशीय संमेलन सकाळी 9 ते संध्याकाळी 5.30 दरम्यान रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे होईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उर्जा, कोळसा आणि नव आणि नवीकरणक्षम उर्जा आणि खाण खात्याचे मंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्री. पियुष गोयल, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) श्री. सुनील पोरवाल, महावितरणचे संचालक श्री. अभिजित देशपांडे आणि रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर असे मान्यवर याप्रसंगी उपस्थित असतील.
लघु उद्योग भारती आपल्या सदस्यांचे आणि सूक्ष्म आणि लघु उद्योजकांचे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन घेणार आहे. केंद्रीय मंत्री श्री. पियुष गोयल प्रास्ताविक सत्रानंतर मुख्य भाषण करणार आहेत तर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस समारोपाच्या सत्रात सहभागी होताना संबोधित करणार आहेत. लघु मध्य उद्योगांच्या सर्व प्रतिनिधी आणि बिगर सदस्यांना आपला सहभाग आधी निश्चित करण्यासाठी लघु उद्योग भारती आमंत्रित करत आहे.
लघु उद्योग भारती (महाराष्ट्र) धोरण प्रभावित करणारी संस्था म्हणून शहर आणि राज्य पातळी सहित केंद्रीय पातळीवरही कार्यरत आहे. आपल्या सदस्यांसाठी त्यांच्या समस्या सोडवण्याचा आणि त्यांच्यात परस्पर संवाद वाढवण्यासाठी आणि विचार विमिमय वाढवण्यासाठी कार्य करते. सरकारच्या महत्वाच्या खात्यांशी आपल्या सदस्यांना सामोरे जायला आणि नोंदणी करायलाही मदत लघु उद्योग भारती करते. महत्त्वाकांक्षी उद्योजकांना त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करता यावा यासाठी नवीन व्यवस्थापन पद्धती, तंत्रज्ञानाची माहिती आणि देवाणघेवाण याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन त्यांना मदत उद्योग भारती करते.