Breaking News

एसटीला व कारला धडक , चौघांची प्रकृती चिंताजनक

पुणे, दि. 28, ऑगस्ट - पुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडी जवळ  (रविवारी) दुपारी दीडच्या सुमारास ट्रकने एसटीला व कारला धडक दिली आहे. यामध्ये  एकूण 21 जण जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजक आहे., ट्रकने स्वारगेटवरून भोरला जाणार्‍या एसटी बस, दोन कार व दोन दुचाकीस्वारांना  धडक दिली. एसटी बस चालकाची प्रकृती गंभीर आहे. एका कारमधील व्यक्तींना मोठी दुखापत झाली आहे. सातारा रोडवर शिंदेवाडीजवळ भोरकडे जाणार्‍या ट्रकचा  ब्रेक फेल झाल्याने या ट्रकने एसटी आणि मारुती कारला जोरात धडक दिली. त्यानंतर ट्रक आणि एसटी ही दोन्हीही वाहने रस्त्याच्या बाजूला असणार्‍यापुलाजवळच्या  खड्यात जाऊन पडली. अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने सातार्‍याकडे आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.या अपघातामध्ये 21  जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.