Breaking News

पुण्यात साकारली ’महाराष्ट्राची लोकधारा’; 21 मूर्तींचा हालता देखावा

पुणे, दि. 28, ऑगस्ट - पुणे - पिंपरी चिंचवड शहरात गणरायाचे आगमण मोठ्या थाटात झाले. प्रत्येक गणेशभक्तांने वेगवेगळ्या संकल्पना राबवत देखाव्यांची  आरास केल्याचे पाहायला मिळत आहे. सांगवीतील जवळेकर कुटुंबियांने देखील अतिशय विलोभनीय असा देखावा साकारला आहे. त्यांनी ’महाराष्ट्राची लोकधारा’  यावर आधारित तब्बल 21 मूर्तींचा पर्यावरण पुरक असा हलता देखावा केला असून बैलगाडीत गणपती बाप्पाला विराजमान केले आहे. सांगवीतील अभिषेक उल्हास  जवळेकर या तरुणाने आपल्या घरात भव्य देखावा बनविला आहे. हा देखावा तयार करण्यासाठी त्याला तब्बल दीड महिन्यांचा कालावधी लागला. त्यात एकूण 26  पर्यावरणपूरक मुर्ती बनविल्या असून त्यापैकी 21 मूर्ती हलत्या स्वरूपातल्या आहेत. या मूर्ती कापडाच्या बनवल्या असून मोटारीच्या सहाय्याने त्यांना हलविण्याचे काम  केले जाते. या देखाव्यात वासूदेव, महाराष्ट्राची लावणी, तुळजापुरचे गोंधळी, शेतकरी कुटुंब, शिवाजी महाराजांच्या शौर्याचे पोवाडे गाणारे शाहिर, कोळी समाज -  धनगर समाज यांची संस्कृती, जेजूरीच्या खंडेरायाचे जागरण, शिवाजी महाराजांची मूर्ती साकारली आहे. गणपती बाप्पाला बैलगाडीत विराजमान केले असून या  बैलगाडीची चाके फिरत्या स्वरूपातील आहे. अशाप्रकारे जवळेकर यांनी ’महाराष्ट्राची लोकधारा’ अतिशय सुंदर स्वरूपात मांडली आहे. हा देखावा पाहण्यासाठी त्यांचे  नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मोठी गर्दी करत आहेत.