सिंधु पाणी वाटप करार : भारत-पाकिस्तानमध्ये पुढील महिन्यात पुन्हा चर्चा
वॉशिंग्टन, दि. 03, ऑगस्ट - सिंधु नदी पाणी वाटप कराराप्रकरणी भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चेची पुढील फेरी होणार सप्टेंबरमध्ये होणार आहे. दोन्ही देशांमध्ये बैठक झाल्यानंतर ही चर्चा सप्टेंबरमध्ये करण्यास जागतिक बँकेने संमती दर्शविली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू नदी पाणी करारासंबंधीत तांत्रिक मुद्द्यांवर झालेली चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात झाल्याचे जागतिक बँकेकडून सांगण्यात आले. याप्रकरणी ‘तोडगा काढण्यासाठी तटस्थ आणि निप्षपातीपणा कायम ठेवण्याचा प्रयत्न करु’, अशा आशयाचे पत्र जागतिक बँकेने 25 जुलै रोजी अमेरिकेतील भारताचे राजदूत नवतेज सरना यांना पाठविले होते.