कसोटी क्रमवारीत जडेजा गोलंदाजांमध्ये अव्वलस्थानी कायम
दुबई, दि. 03, ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत फिरकीपटू रवींद्र जडेजाने अव्वलस्थान कायम राखले आहे, तर रवीचंद्रन अश्विनने श्रीलंकेचा हंगामी कर्णधार रंगना हेराथला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे हेराथ तिस-या स्थानी घसरला आहे. श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या कसोटीतील चांगल्या कामगिरीमुळे मोहम्मद शमी एक स्थान वर सरकून 23 व्या स्थानी पोहोचला आहे.
फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ अव्वलस्थानी आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, पहिल्या कसोटीत दीडशतकी खेळी करणारा चेतेश्वर पुजारा विराटला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर 190 धावांसह सामनावीर ठरलेला शिखर धवन 21 स्थानांची मोठी झेप घेऊन 39 व्या स्थानी विराजमान झाला आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा आणि अश्विन अनुक्रमे दुस-या आणि तिस-या क्रमांकावर आहेत. बांगलादेशचा शाकीब अल हसन अद्यापही अव्वलस्थानी कायम आहे.