Breaking News

गरडवाडी येथे गणेशोत्सवनिमित्त छत्रपती चरित्र कथेचे आयोजन

अहमदनगर, दि. 27, ऑगस्ट - तालुक्यातील गरडवाडी येथे गणेशोत्सवनिमित्त राजा छत्रपती शिवछत्रपती चरित्र कथा सोहळ्याचे सोमवारी दि.28 आयोजन करण्यात आले आहे. महंत  ह. भ.प. हरेराम शास्री महाराज हे कथेचे प्रवक्ते असून गरडवाडी येथील हनुमान मंदिरासमोर रोज रात्री 8 ते 10 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. भीषण पतनयुग, क्षत्रियकुलवंतस परंपरा, दार उघड बया दार उघड, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, बलिदानाचे आत्मयश, जशास तसे वागणे हाच धर्म, मगरमिठी स्वराज्याचे ग्रहण, सुवर्ण क्षण पण काळोखाचा कडा, द्विग्विजय व सूर्यग्रहण आदी कथामालिकेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वर्णन केले जाणार आहे. सोमवारी दि.4 ) सकाळी 9 ते 11 या वेळेत महंत हरेराम शास्रवी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने या कथा सोहळ्याची सांगता होईल. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या कथासोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.