Breaking News

इको फ्रेंडली गणेश मूर्तींचे वाटप

मिरजगांव, दि. 27, ऑगस्ट - पर्यावरपूरक गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत पाण्यात लवकर विरघळत असल्याने मिरजगांव येथे अशा दोनशे गणेशमूर्तींचे विनामूल्य वाटप करण्यात आले. पर्यावरण स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरणासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी एच. यु. गुगळे शोरुमचे संचालक रामदास माने, सरपंच खेतमाळस, जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव तनूपुरे, पंढरीनाथ गोरे, ग्रामपंचायत सदस्य लहू वतारे, विधिज्ञ अभय खेतमाळस, ग्रामसेवक प्रताप साबळे, चंद्रकांत साळवे, सचिन खामकर, रंजन खामकर आदी उपस्थित होते.