Breaking News

हिंसा खपवून घेणार नाही, पंतप्रधानांचा ‘मन की बात’मधून इशारा

नवी दिल्ली, दि. 27, ऑगस्ट - श्रद्धा आणि भक्तीच्या नावाखाली होणारा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की  बात मधून दिला.हरयाणात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला . मन की बात च्या 35 व्या भागात बोलताना पंतप्रधान म्हणाले की , ’ हा देश  गांधी व बुद्धांच्या विचारसरणीवर चालणारा देश आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारे हिंसा खपवून घेतली जाणार नाही. 
मी 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरील भाषणातही म्हणालो होतो की श्रद्धेच्या नावाखाली हिंसा खपवून घेतली जाणार नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. कायद्याने  दोषींना शिक्षा होणारच, असेही ते म्हणाले.
देशातील उत्सवांबाबत बोलताना ते म्हणाले की, वर्षातील 365 दिवसांपैकी सण-उत्सव नसलेले मोजकेच काही दिवस उरत असतील. सध्या देशात गणेशोत्सवाचा  उत्साह आहे. सर्व देशवासियांना गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा. केरळमध्ये सध्या ओणमचा सणही साजरा केला जात आहे. देशातल्या विविधांगी सणांच्या परंपरेतला  ओणम हा एक महत्त्वपूर्ण देश आहे. यावेळी त्यांनी देशवासियांना ईद-उल-जुहाच्याही शुभेच्छा दिल्या.