Breaking News

नगरमध्ये दमदार पाऊस बरसला

जनजीवन विस्कळीत , रब्बीसाठी शेतकरी आशादायी

अहमदनगर, दि. 21 - सुमारे दोन महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर वरुण राजाची कृपा झाली असून शनिवारी रात्री व रविवारी  दिवसभर   झालेल्या दमदार  पावसाने   नगर  शहराची दैना केली आहे, या धुवांधार पावसाने  शहराला अक्षरश:  झोडपून काढले आहे. शहराबरोबरच जिल्हयातही सर्वदूर पाऊस झाल्याचे वृत्त आहे. शहरात संततधार सुरु असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत, सिनानदीला अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच पूर आला असून भिंगार येथेही नाले तुडुंब भरून वाहत  आहेत. रस्त्यावर पाणी आले आहे, ओढे, नाल्याना पाणी आले आहे, वाढत्या पाण्याचे नियोजन नसल्याने शहरातील अनेक भागात गटारे तुंबली, त्यामुळे गल्लोगल्ली पाणी शिरले. रस्त्यावर पाणी असल्याने वाहनचालकांची  त्रेधापिट  उडाली, महापालिकेची आपतकरलिन यंत्रणा कार्यरत दिसली नाही.
शहरातील दिल्लीगेट, बागरोज हडको, निलक्रांती चौक, सिद्दीबाग, नालेगाव या परिसरात मोठया प्रमाणात पाणी तुंबल्याने रहदारी पूर्णपणे बंद पडली,  पाण्यातून वाहने काढताना नागरिकांचे अतोनात हाल झाले, वाहने काढतांना स्थानिक तरुणांनी मदतीचा दिला.
यंदा पाऊस सरासरी 95 टक्के पडेल असा हवामान खात्याचा अंदाज होता, पण सुरवातीला पाऊस आल्यानंतर तो गायब  झाला. सुमारे दोन महिन्यानंतर माघ नक्षत्रात तो आला आहे, या जोरदार  पाऊसमुळे  समाधान    व्यक्त होत  आहे शहराबरोबर जिल्हातील राहुरी, अकोले, नेवासे, पाथर्डी, पारनेर आदी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. पाथर्डी तालुक्यात अनेक नद्यांना पूर आले आहेत, भेंडा परिसरात अनेक ओढ्याना पूर आल्याने भेंडा खुर्द, गोंडेगाव, चिंचोली या गावांचा भेंडे गावाशी संपर्क तुटला आहे, मूळ धरण लाभक्षेेत्रात सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. रविवारी रात्रीही पावसाची संततधार सुरु होती.
एक महिन्यापासून विश्रांती घेतलेल्या  पावसाने शनिवारी नगर शहरासह जिल्ह्यातील 14 तालुक्यात हजरी लावली सरासरी सर्वच ठिकाणी 50 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे . या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे खरिपाला  जीवदान मिळाले आहे.
बळीराजाला मोठ्या पावसाची अपेक्षा होती खरिपाची पिके शेवटची घटक मोजत होती मात्र शनिवारी  दमदार पावसाने हजरी लावली  त्यामुळे वाया जाणारी पिके वाचणार आहेत.  शनिवारी रात्री 9 वाजता सुरु झालेला पाऊस संततधार रविवारी दुपारी 3 पर्यत सुरु होता अधूनमधून  हलक्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. सलग 16 तास पडलेला पाऊस असा जामखेड 80 पारनेर 75 पाथर्डी ,कर्जत  60 ,शेवगाव 53 श्रीगोदा 50 नगर 42 नेवासा 40 रायरी 30 श्रीरामपूर 20 अकोला 15  संगमनेर 12 कोपरगाव 10 मि.मि. अशी नोंद झाली आहे.
जामखेड तालुक्यातही
जोरदार पावसाची हजेरी
जामखेड ः शहरासह तालूक्यात दोन दिवसापासून पावसाने झोडपले असून शहरातील अनेक भागामध्ये पावसाचे पाणी घरात ,दुकाणात शिरल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या दोन दिवसात तालूक्यात एकूण पाऊस सरासरी एवढा झाला आहे. जामखेड शहरातून जाणारी विंचरना नदी दुथडी भरून वाहु लागली आहे. त्यामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.दि. 19 ऑगस्ट रोजी बाजार असल्याने मोठया प्रमाणात भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.
जामखेड शहरात दि. 19 रोजी शनिवार हा आठवडे बाजार असल्याने तालूक्यात मोठा बाजार भरतो. योगायोगाने हा बाजार पोळयाच्या सणासाठी शेवटचा बाजार होता. त्यामुळे या बाजारासाठी तालूक्यातून मोठया प्रमाणात खरेदीसाठी नागरिक ,शेतकरी आले होते. त्यामुळे या बाजाराची लाखोंची उलाढाल होत असतानाच अचानक दुपारी दोनच्या दरम्यान पावसाने सुरूवात केली आणि कधी नव्हे एवढा जोराचा पाऊस आला. आणि सर्वांची तांराबळ करून गेला. बाजार करूचे मोठया प्रमाणात हाल झाले शेतक-यांनी आणलेल्या भालीपाल्यांचे मोठे नुकसान झालेत्र अक्षरशा भाजी पाला रस्त्यावर फेकुन  दयावा लागला. व बाजारात मोठया प्रमाणात पाणी साचले. ही घाण उचलण्यासाठी नगर परिषदेकडे पुरशी यंत्रणा नसल्याने मोठी दुर्गंधी सुटली आहे. तो भाजीपाला दुस-या दिवशीही तसाच पडूून होता. त्यानंतर 19 व 20 रोजी पावसाने उघडीप दिलेली नाही. या पावसाने काही प्रमाणात दिलासा दिला असला तरी शहरातील अनेक भागात  घरामध्ये दुकाणामध्ये मोठया प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे व्याप-यांचे मोठे नुकसान झाले आहे. नगर रस्त्यावरील खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलातील दुकाणामध्ये  पाणी शिरल्याने मालाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे नगर परिषदेच्या वतीने तपनेश्‍वर भागात ऐन पावसाळयात गटारीचे काम सुरू असून गटारीचे खोदकाम चालू असल्याने व त्यातील गाळ रस्त्यावर टाकल्याने या रस्त्यावरून जाणारे अनेक वाहने गाळात रूतून पडली. अनेक नागरिक घसरूण पडले. तरी देखील याकडे नगर परिषदेचेेने  दुर्लक्ष केले. यामुळे नागरिकांचे मोठया प्रमाणात हाल झाले. तालुक्यात 19 व 20 रोजी जामखेड 87, नायगांव 92, खर्डा 114, अरणगांव 83.2, नान्नज 61.4, मिली मिटर एवढा पाऊस झाला आहे.    
शेवगाव शहरातील रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी                                                      शेवगांव ः गेल्या दोन  महिन्यापासून गायब झालेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारी चार पर्यंत तालुक्यात सर्व दूर हजेरी लावली. ओढे, नाले व नद्यांना पाणी वाहिले. या पावसाने  खरिप पिकांना जीवदान मिळाले असून जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.  उद्याच्या श्रावणी पोळा सणावरचे दुष्काळाचे सावट दूर झाल्याने बळीराजा सुखावला आहे. तालुक्याच्या पुर्व भागातील बोधेगाव मंडलात सर्वाधिक 160 मिलीमीटर पाऊस पडला.
शेवगाव तालुक्यात सर्वदुर जोरदार पाऊस झाल्याने नागरीकांची दैना उडाली. अनेक नद्यांना पुर आल्याने वाहतुक ठप्प झाली होती. पावसाणे बाहेर पडता येत नसल्याने शुकशुकाट होता.  शहरातील आठवडे बाजारही बंद ठेवला होता. सुमारे अठरा तास विज गायब झाली होती.पावसाळा ऋतु सुरु झाल्यापासुन अपवाद वगळता पावसाचा खंड राहात गेल्याने दुष्काळी परिस्थीती निर्मान झाली जनावरांच्या चार्‍यासह पाणी, पिके धोक्यात आली. जनावरांच्या कृपेने पोळा सणाच्या आसपास पाऊस येईल असे काही वृध्द जाणकार मत व्यक्त करीत असताणा हवामान विभागाणेही पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार हा अंदाज यावेळी खरा ठरला गेला. शनिवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान भिजपावसास सुरवात झाली अधुन मधुन तो बरसत राहिला मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास पावसाणे जोर धरला रविवारी सकाळी सर्व नागरीक झोपेतुन जागे झाले तेव्हा पाऊस वाढता होता. सकाळी आठ वाजता काही वेळ जोरदार पाऊस झाला मधुन मधुन तो असाच बरसत राहिला. ढगांचा आवाज, तर क्वचीत विजेचा लखलखाट होत मध्यम ते जोरदार पावसाणे कोणालाही घराबाहेर पडता आले नाही. गावागावात शुकशुकाट होता दुकानेही बंद होती.पावसाने शेतात पाणीच पाणी दिसत होते. ओढे, नाले तुडूंब भरूण वाहिले सर्वच नद्यांना पुर आला अमरापूर येथील साकुळा नदी, सामनगाव डोमेसार, वडूलेची वाघा, मळेगावची कुराळ व फरशी पुल, ढोरजळगाव जवळून वाहणारी ढोरा नदी,  बोधेगाव, आखेगाव आदि नंद्याच्या पुलावरुण पाणी वाहत असल्याने जवळपास दोन ते तीन तास वाहतुक ठप्प झाली होती. तर पावसामुळे 18 तास विज गायब होती. शेवगाव शहरात गटारी तुंबुन रस्त्यावर पाणीच पाणी वाहात होते काहीच्या घरात पाणी शिरले रस्त्यावर पाणी असल्याने ते दिसेनासे झाले होते. शहरातील रविवारचा आठवडे बाजारही बंद राहीला.
पाथर्डीतही दमदार
पावसाची जोरदार हजेरी
पाथर्डी ः गेल्या दोन दिवसातील भीज पावसामुळे तालुक्यातील खरीपांच्या पिकांना जीवदान मिळाले असुन लवकरच रब्बीच्या पेरण्यांना प्रारंभ होणार आहे. भीज पावसामुळे जनावरांच्या चार्‍याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे.
सकाळी आठ वाजता नोंदविलेल्या माहितीनुसार पाथर्डी येथे सर्वाधीक 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली . दुपारी तीन वाजेपर्यंत पाउस सुरू होता. सुमारे दीड महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर तालुक्यात सर्वदुर पाउस पडला पाथर्डी 63 ( 278 ), माणिकदौंडी 45 (240 ), मिरी 42 ( 185 ), करंजी 34 ( 210 ), टाकळीमानुर 50 ( 262 ) मिलीमीटर एवढा पाउस नोंदला गेला. तालुक्याच्या पूर्व भागातील तसेच तिसगाव परिसरातील बरेच बंधारे भरले असुन डोंगरमाथ्यावरील सलग समतल चरामध्ये सर्वत्र पाणी साचले आहे.