Breaking News

गणेशोत्सवासाठी ठाणे महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज

ठाणे, दि. 24, ऑगस्ट - पर्यावरणाभिमुख गणेशोत्सव ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात रुजवून राज्यामध्ये नवा आदर्श निर्माण करणा-या ठाणे महापालिकेचीयंत्रणा  सज्ज झाली असून यावर्षीही पर्यायी विसर्जन व्यवस्थेसाठी कृत्रीम तलावांची निर्मिती केली असून नागरिकांनी महापालिकेने निर्माण केलेल्यापर्यायी व्यवस्थेचा वापर  करावा असे आवाहन महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.
पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून उपाययोजना करीत असून यामुळे शहरांमधील तलावांमध्येहोणारे प्रदूषण रोखण्यासाठी  महापालिकेच्यावतीने पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात येत आहे. या व्यवस्थेला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळतआहे. यावर्षीही तशाच प्रकारची व्यवस्था  करण्यात आली असून सर्व गणेश भक्तांनी याला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यातआले आहे.
पारसिक रेतीबंदर व कोलशेत येथे विसर्जन महाघाट हिंदू संस्कृतीप्रमाणे श्री गणेश मुर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातूनमहापालिकेने पारसिक  रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे विसर्जन महाघाट तयार केले आहेत. या ठिकाणी छोटया गणेश मुर्तींबरोबरच 5फुट आणि त्यापेक्षा मोठया आकाराच्या  गणेश मुर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेने आरतीस्थाने आणि निर्माल्यकलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना श्री गणेश विसर्जन  सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गणेश भक्तांच्यावाहनांसाठी वाहन तळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था,  वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृह अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. दरम्यान या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले विसर्जन घाट भरती आणि ओहोटी लक्षात  घेऊनच बांधण्यात आले आहेत.