Breaking News

तुरुंगात जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावणार न्यायधीश

चंदीगड, दि. 27, ऑगस्ट - बलात्कार प्रकरणातील आरोपी बाबा गुरमीत राम रहीमला शिक्षा सुनावण्यासाठी सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश रोहतक तुरुंगात जाऊन  शिक्षा सुनावणार आहेत. राम रहीमला सोमवारी कोर्टात नेण्याऐवजी न्यायाधीशच आता तुरुंगात जाऊन शिक्षा सुनावणार आहेत.
राम रहीम साध्वीवरील बलात्कार प्रकरणात दोषी आढळल्यानंतर हरियाणात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. राम रहीमच्या समर्थकांनी कायदा हातात घेत जाळपोळ  केली आणि मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान केलं. या हिंसाचारात 31 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत. शिक्षेच्या  सुनावणीसाठी रोहतक तुरुंगातच सोमवारी कोर्ट रुम तयार करण्यात येणार आहे. सीबीआय कोर्टाच्या न्यायाधीशांना हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात आणलं जाणार आहे.  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.