Breaking News

गुजरातमधील अपघातात महाराष्ट्रातील 11 जणांचा मृत्यू

अहमदाबाद, दि. 27, ऑगस्ट - गुजरातमधील बरवाला येथे आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच  महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील भाविक गुजरातमधील पालिताना येथे दर्शनासाठी निघाले होते. अहमदाबादमधील धंधुका-बरवाला रस्त्यावर भाविक बसून जात असलेल्या ट्रकची आणि  जीपची धडक झाली.