Breaking News

पंतप्रधान मोदी यांनी केली बिहारमधील पूरस्थितीची हवाई पाहणी

पाटणा, दि. 27, ऑगस्ट - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पूरस्थितीची हवाई पाहणी केली .पाहणीनंतर बिहारमधील पूरग्रस्तांसाठी त्यांनी 500 कोटी  रूपयांची मदत जाहीर केली. यावेळी मोदी यांच्याबरोबर मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी होते. बिहारमध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत सुमारे  418 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एक कोटीहून अधिक जणांना पुराचा फटका बसला आहे.
मदत कार्यासाठी सर्वतोपरी मदत करणार आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय अधिका-यांचे पथक पाठवण्यात येणार असल्याचे आश्‍वासन मोदी यांनी दिले.  हवाई पाहणी केल्यानंतर पूर्णिया जिल्ह्यात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.