Breaking News

पेट्रोलच्या टँकरला आग लागल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद


पुणे,दि.6 : खालापूर टोलनाक्याजवळ भोकरपाडा येथे पेट्रोलच्या टँकरला आग लागल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र पुण्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरु आहे. रसायनी जवळच्या भोकरपाडा येथे सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. वाहतूक कोंडीमुळे पर्यायी मार्ग म्हणून या मार्गावरची वाहतूक सावलामार्गे वळविण्यात आली आहे.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर आज सकाळी भोकरपाडा येथट्रोलचा टँकर पलटी झाल्याने त्यातील पेट्रोल रस्त्याच्या कडेला सांडले. हे पेट्रोल एक किलोमिटर पर्यंत वाहत गेले. काही अंतरावर चार ते पाच इसम प्रात:विधीसाठी बसले होते. त्यापैकी एकाने बिडी पेटवल्याने पेट्रोलने पेट घेतला. आग टँकरपर्यंत पोचल्याने टँकरनेही पेट घेतला. या घटनेमुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांना
आग विझवण्यात यश आले आहे मात्र या घटनेत टँकर जळून खाक झाली आहे. तर मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक मंद गतीने सुरु आहे.