Breaking News

अहमद पटेल यांचा पराभव निश्‍चित - विजय रूपानी

अहमदाबाद, दि. 08, ऑगस्ट - काँग्रेसचे आपल्या आमदारांवर नियंत्रण नाही, त्यामुळे गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांचा  पराभव होणार, असे मत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी व्यक्त केले. राज्यातील पूरग्रस्त परिस्थितीकडे दुर्लक्ष करून काँग्रेसचे आमदार कर्नाटकमधील  रिसोर्टमध्ये सुट्टीचा आनंद लुटत असल्याची टीकाही रूपानी यांनी केली. बंगळुरूमध्ये बंदिस्त करून ठेवलेले गुजरातमधील काँग्रेसचे आमदार आज अहमदाबादमध्ये  परतले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर रूपानी बोलत होते.
राज्यात आलेल्या पुरात अनेक लोक मृत्यूमुखी पडले. मात्र, याकडे काँग्रेसचे लक्ष आहे. काँग्रेसचे आमदार कर्नाटकमध्ये जाऊन मौजमजा करत होते. काँग्रेसचा  आपल्या आमदारांवर विश्‍वास नाही, असेही रूपानी यांनी नमूद केले.