Breaking News

बंगळुरूमधील कारागृहात शशिकला यांना विशेष सुविधा ?

बंगळुरू, दि. 22, ऑगस्ट - बंगळुरूमधील मध्यवर्ती कारागृहात अण्णाद्रमुक पक्षाच्या प्रमुख व्ही.के.शशिकला यांना विशेष सुविधा पुरवल्या जात  असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये शशिकला तुरूंगाच्या आत - बाहेर जाताना दिसत आहेत. माजी तुरुंग पोलीस  उपमहानिरीक्षक डी. रूपा यांनी कर्नाटक पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांकडे सीसीटीव्ही फुटेज सोपवले आहे.
रूपा यांनी गेल्या महिन्यात तात्कालीन पोलीस महासंचालक एच.एन. सत्यनारायण राव यांना या संदर्भात एक अहवाल सोपवला होता. शशिकला यांनी  कारागृहात विशेष सुविधांसाठी तुरूंग अधिका-यांना दोन कोटी रूपयांची लाच दिल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते. यानंतर सरकारने हे प्रकरण  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवले होते.