विमानतळावर पुन्हा बैठका नाही, ‘एएआय’ची न्यायालयात ग्वाही
पणजी, दि. 22, ऑगस्ट - विमानतळावर सार्वजनिक बैठका घेण्याचा प्रकार पुन्हा होणार नाही अशी ग्वाही भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून (एएआय) मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी पीठास देण्यात आली. त्यामुळे कोणत्याही कारवाईच्या आदेशा शिवाय हा खटला निकाली काढण्यात आला.
1 जुलै रोजी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गोवा विमानतळावर सार्वजनिक बैठक घेतली होती. त्या विरोधात ऐरिस रॉड्रिक्स यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावेळी गोवा विमानतळाचे संचालक भूपेश नेगी यांनी सुनावणीदरम्यान सादर केलेल्या आपल्या लिखित जबाबात म्हटले की, भविष्यात अशी घटना घडणार नाही. विमानतळ परिसराचा कोणत्याही परिस्थितीत अशाप्रकारे वापर केला जाणार याची भारतीय विमानतळ प्राधिकरण काळजी घेईल. ही बैठक अचानक आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे अनुमती मागण्या इतका वेळ नव्हता, असेही प्राधिकरणाने न्यायालयात सांगितले.