आशा वर्करांच्या माधनाचा प्रश्न सोडविला जाईल : ना. देशमुख
सातारा, दि. 21 (प्रतिनिधी) : आशा वर्कर हा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचणारा शासनाचा घटक आहे. या आशा वर्करांच्या माधनाबाबत येत्या 15 दिवसात आरोग्य मंत्र्यांच्या सोबत बैठक घेवून मानधनाचा प्रश्न लवकरच सोडविला जाईल, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी दिले.
येथील निर्मल मंगल कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या आशा महिला वर्कर मेळाव्यात सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मेळाव्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी विनीत फाळके, जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार, करण जगताप, आनंदी अवघडे, स्वाती शेगडे यावेळी उपस्थित होते.
आजच्या मेळाव्यात मला 12 मागण्याचे निवेदन मिळाले आहे, असे सांगून सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री देशमुख पुढे म्हणाले, शासन दरबारी आशा वर्कराच्या प्रश्नांबाबत अनेक वेळा बैठका झाल्या आहेत. त्यांचे काही प्रश्न मार्गी लागले आहेत. आशा वर्करांचा मी प्रतिनिधी म्हणून तुमच्या मागण्या शासनाकडे मांडणार आहे. कमी पगार घेणारे व विश्वासाने काम करणारे हे आशा वर्कर आहेत. त्यांच्यामुळेच आरोग्य यंत्रणेचे काम ग्रामीण भागात सुरळीत चालू आहे.
जिल्ह्यात 2 हजार 545 आशा वर्कर कार्यरत आहेत. आशा वर्कर या खेड्यात, वाड्या, वस्त्यांवर जावून काम करतात. आपण ज्या मागण्या केल्या आहेत त्या रास्त आहेत. आशा वर्करांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींवर मात करुन तुम्ही चांगले काम करता. तुमच्या मानधनाचा प्रश्न निश्चित सोडविला जाईल. तसेच इतर मागण्यांबाबत पाठपुरवा केला जाईल, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री देशमुख यांनी दिले. या मेळाव्याचे प्रास्ताविक आनंदी अवघडे यांनी केले तर आभार चित्रा झिरपे यांनी मानले. या मेळाव्यास आशा वर्कर व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सामुहिक स्वरुपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनियम करुन व संविधानिक मार्गानी सोडवीन, अशी प्रतिज्ञा यावेळी देण्यात आली. याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.