Breaking News

हिंसाचारामुळे पंजाब - हरियाणाची रेल्वे सेवा विस्कळीत

नवी दिल्ली, दि. 27, ऑगस्ट - हरियाणामधील हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर पंजाब-हरियाणाकडे जाणा-या तब्बल 661 रेल्वे गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.  पंजाब-हरियाणाच्या दिशेने जाणा-या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव हा  निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हरियाणा व पंजाबच्या दिशेने जाणा-या 309 रेल्वे गाड्या 28 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. हरियाणाकडे  जाणा-या आत्तापर्यंत 294 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, 58 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, असे उत्तर रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले.