Breaking News

गुरमीत राम रहीम यांना विशेष वागणूक नाही - तुरुंग अधिकार्‍यांचा खुलासा

चंडीगड, दि. 27, ऑगस्ट - गुरमीत राम रहीम एक सामान्य कैदीच असून त्यांना विशेष वागणूक दिली जात नसल्याचे स्पष्टीकरण हरियाणाचे तुरूंग अधिकारी  के.पी.सिंग यांनी दिले आहे. त्यांना वातानुकूलीत सेवा अथवा मदतनीस अशा चैनीच्या सुविधा दिलेल्या नाहीत . राम रहीम सुनारीया तुरुंगात आहेत, कुठल्याही  अतिथिगृहात नाही त्यामुळे त्याला कोणत्याही वेगळया सुविधा दिलेल्या नाहीत, असे के . पी . सिंग यांनी सांगितले .
राम रहीमला तुरुंगात पिण्यासाठी मिनरल वॉटरचे पाणी तसेच बाहेरुन जेवण मागवण्याची मुभा दिली जाते, सहाय्यक दिला आहे, असे सांगितले जात होते. त्या  पार्श्‍वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आले.