दहशतवाद्यांच्या मदतीचे स्त्रोत रोखण्यासाठी एनआयएची योजना - राजनाथ सिंग
लखनौ, दि. 21, ऑगस्ट - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मिळणारे मदतीचे स्त्रोत रोखण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा प्रयत्न करीत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज येथे सांगितले . देशात बनावट नोटा कोठून येतात, याचा शोध तपास यंत्रणेकडून केला जात आहे. याचा शोध लागला की दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयाच्या (ऑफिस ऑफ रेसिडेंशियल कॉम्प्लेक्स) उद्घाटन प्रसंगी राजनाथ सिंग बोलत होते.
या प्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. 2009 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे आतापर्यंतचे काम कौतुकास्पद आहे. तपास यंत्रणेचे लखनौमधील हे पहिले कार्यालय आहे. सध्या तपास यंत्रणेकडून एकूण 165 प्रकरणांचा तपास केला जात आहे. कार्यालयामुळे तपास यंत्रणेचे कामकाज आणखी चांगले होण्याची आशा सिंग यांनी व्यक्त केली.
देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याचा निर्धार सरकारने केला आहे. ईशान्य भारतही दहशतवादग्रस्त आहे. मात्र आधीच्या तुलनेत तेथील दहशतवादी कारवायांत 75 टक्के घट झाली आहे. नक्षलवादी कारवायांतही 40 टक्क्यांनी घट झाली आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदतीपासून बनावट नोटांपर्यंतच्या सर्व प्रकरणांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून केला जात आहे, असेही सिंग म्हणाले.