Breaking News

माझा मोदींना पाठिंबा मात्र अमित शाहना विरोध - ममता

कोलकाता, दि. 21, ऑगस्ट - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माझे काही म्हणणे नाही मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना विरोध आहे, असे  पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. नोटा रद्दचा निर्णय, वस्तू व सेवा कराची अंमलबजावणुळे पंतप्रधान मोदी यांच्यावर वारंवार टीका  करणा-या ममताच्या या वक्तव्यामुळे विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
येथील स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ममता यांनी हे वक्तव्य केले. पंतप्रधान मोदींना माझा पाठिंबा आहे. मात्र, अमित शाह यांच्या  कार्यपद्धतीला आपला विरोध आहे . पंतप्रधानांना दोषी ठरवत नाही. त्यांच्या पक्षाने जबाबदारीने वागले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.देशात सध्या  हुकूमशाहीचे वातावरण आहे. एका पक्षाचे अध्यक्ष सरकारी कामात हस्तक्षेप करत आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. माजी पंतप्रधान अटल बिहारी  वाजपेयी यांच्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, तेही भाजपचे नेते होते. मात्र ते निष्पक्ष व संयमी पंतप्रधान होते. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना  आम्ही कधीच अडचणी आल्या नाहीत. मात्र सध्याच्या भाजप सरकारबरोबर काम करताना आम्हाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी मी  पंतप्रधानांना दोषी धरत नाही. त्यांच्या पक्षाने अधिक जबाबदरीने वागणे अपेक्षित आहे, असे त्या म्हणाल्या.