Breaking News

’अण्णा द्रमुक’च्या दोन गटांचे लवकरच एकत्रिकरण - पनीरसेल्वम

चेन्नई, दि. 21, ऑगस्ट - अण्णाद्रमुकमधील दोन गटांचे एकत्रिकरण करण्यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच हे दोन्ही गट एकत्र आलेले दिसतील, असे  तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी आज येथे सांगितले. आपल्या गटातील नेत्यांशी या बाबत झालेल्या अनौपचारिक चर्चेनंतर त्यांनी ही  माहिती दिली. दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्यासाठीचे शुक्रवारी रात्री झालेले प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर त्यांनी आपल्या गटातील नेत्यांची बैठक घेतली.  भविष्यातल्या त्यांच्या गटाच्या भूमिकेबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
पनीरसेल्वम यांच्या गटातील सदस्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे शुक्रवारी रात्री या संदर्भातील बैठक निष्फळ ठरल्याचे सांगितले जात आहे.