लव-जिहादच्या समस्येकडे लक्ष न दिल्यास नवा पाकिस्तान - तरूण सागर
जयपूर , दि. 21, ऑगस्ट - लव-जिहादच्या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याने नवा पाकिस्तान निर्माण होईल, अशी भीती जैन मुनि तरूण सागर महाराज यांनी व्यक्त केली आहे. सिकर येथील सीएलसी शिक्षण संस्थेतील व्याख्यानात ते बोलत होते. लव-जिहाद हे आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे. हिंदू मुलींना मुस्लिम बनवण्याचे हे षड्यंत्र आहे. सरकारने वेळीच लव जिहादमुळे भविष्यात निर्माण होणारा धोका वेळीच ओळखायला हवा. नाहीतर आणखी एका पाकिस्तानची निर्मिती होईल, असे ते म्हणाले.
सरकारने लव्ह जिहाद च्या घटनांमागे असणा-यांविरोधात कारवाई करायला हवी, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संस्कारांचे महत्त्व पटवून दिले.
सरकारने लव्ह जिहाद च्या घटनांमागे असणा-यांविरोधात कारवाई करायला हवी, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संस्कारांचे महत्त्व पटवून दिले.